कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे काव्यसाहित्य प्रत्येकाला दिशादर्शक आणि प्रेरणादायी- प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी
फैजपूर- खान्देश भूमीचे वैभव आणि जनसामान्यांना साध्या, सोप्या भाषेत जीवनाचे रहस्य अलगद उलगडून दाखवण्याचे सामर्थ्य निसर्गकन्या बहिणाईत आहे, असे गौरवोउद्गार तापी परीसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामविस्तार सोहळ्याप्रसंगी विद्यापीठ परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयात आयोजित बहिणाईच्या काव्यमय जीवन परीचय होण्याच्या उद्देशाने आयोजित ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रमात काढले.
बहिणाबाई चौधरी यांचा काव्यमय जीवनप्रवास
विद्यापीठाच्या सूचनेनुसार धनाजी नाना महाविद्यालयात प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी विविध कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आयोजन समिती तयार केली. त्यात विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक प्रा.डॉ.गोपाळ कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली प्रा.डॉ.सिंधू भंगाळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.शरद बिर्हाडे, राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी प्रा.लेफ्टनंट राजेंद्र राजपूत, क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.गोविंद मारतळे, युवती सभा प्रमुख प्रा.डॉ.सविता वाघमारे, प्रा.डॉ.सविता तडवी, प्रा.सतीश पाटील, प्रा.रवी केसूर आदी प्राध्यापकांची आयोजन समिती तयार करण्यात आली. समिती मार्फत प्रथम कार्यक्रमात प्राणी शास्त्र विभागातील प्र.डॉ.राजश्री नेमाडे यांचे निसर्गाकण्या बहिणाबाई चौधरी यांचा काव्यमय जीवनप्रवास या विषयावर संगीतमय कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात आला.
खुल्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन
विविध उपक्रमाचा भाग म्हणून महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाने पुढाकार घेऊन बहिणाईंचे साहित्य सर्व विद्यार्थ्यांसाठी खुले केले. त्यात बहिणाईंचे काव्य संग्रह, समीक्षाग्रंथ, संदर्भ पुस्तके यासोबत क्यू आर कोड तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध लिंक उपलब्ध करून काव्याच्या ऑडिओ व्हिडिओ सादरीकरण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या. या खुल्या ग्रंथालयाचे प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य प्रा.डॉ.अनिल भंगाळे, उपप्राचार्य प्रा.डॉ.उदय जगताप, उपप्राचार्य प्रा.अनिल सरोदे, प्रा डॉ गोपाळ कोल्हे, प्रा डॉ मनोहर सुरवाडे, प्रा राजेंद्र राजपूत, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रा आय जी गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाला सहाय्यक ग्रंथपाल प्रा.व्ही.एस.सिसोदे, विकास बावस्कर, फरीद तडवी, सहर्ष चौधरी, नितीन सपकाळे, शेखर महाजन यांनी सहकार्य केले.