काशी एक्स्प्रेसमध्ये दरोडा ; तिघा संशयीतांची निर्दोष सुटका

0

भुसावळ- डावून काशी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकल्याप्रकरणी पाच संशयीतांविरुद्ध भुसावळल लोहमार्ग पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 2 ऑगस्ट 2008 ही घटना घडली होती. या प्रकरणी नितीन कोचुरे, शेख ईरफान शेख.रशीद, प्रकाश बाजीराव कोचुरे, विनोद कचरू मोरे, सुभाष पंडित कोचुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात नितीन कोचुरे हा गुन्हा घडल्यापासून पसार असून शेख ईरफान शे.रशीद मयत झाले होते. भुसावळ सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाज चालल्यानंतर साक्षीदारांच्या जवाबात तफावत आढळल्याने संशयाचा फायदा देत प्रकाश कोचुरे, विनोद मोरे व सुभाष कोचुरे यांची न्या.एस.पी.डोरले यांची निर्दोष सुटका करण्यात आली. संशयीतांतर्फे अ‍ॅड.अल्बर्ट पी.डिसोजा यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड.विनोद प्रल्हाद तायडे यांनी सहकार्य केले.