श्रीनगर। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढणार्या भारतीय जवानांसमोर आता बेडरूम जिहादींच्या रुपाने नवे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे सीमेपलीकडील दहशतवाद्यांविरोधात लढणार्या भारतीय जवानांना आता नव्या जिहांदीशी सामना करावा लागत आहे. नव्याने उघड झालेल्या या बेडरूम जिहादमध्ये, असामाजीक तत्वे सुरक्षितपणे घरात लपून सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवत आहेत. काश्मीर खोर्यातील बेरोजगार तरुणांना लक्ष्य करून त्यांना आपल्या प्रभावखाली आणण्याचा प्रयत्न बेडरूम जिहादच्या माध्यमातून केला जात आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार बेडरूम जिहाद हे नव्या स्वरुपाचे युद्ध असून, ते नेहमीच्या पारंपारिक युद्धाप्रमाणे यामध्ये कोणतेही शस्त्र न वापरता लढले जात आहे. नव्या जमान्यातील या जिहादी युध्दासाठी कॉम्प्युटर आणि स्मार्टफोन्सचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे हे युद्ध लढण्यासाठी काश्मीरमध्येच असण्याची अवाश्यकता राहिली नसून ते देशातील, परदेशातील रस्त्यावर, एखादा कॅफे किंवा फुटपाथवर बसून लढता येणार आहे.
अधिकार्यांनी या शत्रुशी लढणे सोपे नाही सांगताना एका काश्मीर पंडित कॉन्स्टेबलचे उदाहरण दिले. हा कॉन्स्टेबल बेपत्ता झाला होता. खूप शोध घेतल्यानंतर 90 किमी अंतरावर कुपवाडामध्ये त्याचा मृतदेह सापडला. तपासाअंती असे समोर आले की, काश्मिरी पंडितांनी अशा काही पोस्ट टाकण्यास सुरुवात केली होती ज्यामध्ये दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण करून हत्या केली असा दावा करण्यात आला होता. मात्र, नंतर त्याच्याच एका सहकार्याने त्याची हत्या केल्याचे स्पष्ट झाले.
अमरनाथ यात्रेची चिंता
भारतीय जवानांना 29 जूनपासून सुरू होणार्या अमरनाथ यात्रेची सर्वात जास्त चिंता लागली आहे. हे बेडरूम जिहादी व्हाट्सअॅप, फेसबूक आणि ट्विटर अशा सोशल मीडियाचा वापर करून 40 दिवसांची अमरनाथ यात्रा सुरू होण्याआधीच काश्मीरखोर्यात जातीय दंगली भडकवतील अशी शंका जवानांना सतावत आहे. ’या आभासी युद्धाच्या माध्यमातून शब्दांचा शस्त्रसारखा वापर करत काश्मिरी युवकांना भडकवले जाते’, असे एका पोलीस अधिकार्याने सांगितले. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये जम्मू काश्मिरात अनेक अफवा पसरवल्या जाऊ शकतात, आणि त्यामधून मार्ग काढण्यासाठी फार कमी वेळ सुरक्षा यंत्रणांकडे आहे. ’आपल्या घरात पलंग किंवा सोफ्यावर बसून कोणीही हजारो चॅट ग्रुप्सवर आक्शेपार्ह विधानं टाकून राज्यात जातीय हिंसाचार भडकवू शकतो’, असे एका पोलीस अधिकार्याने सांगितले.धोकादायक म्हणजे अशा प्रकारचे सोशल चॅट ग्रुप फक्त जम्मू काश्मीरच नाही तर राजधानी दिल्लीसह अन्य राज्य आणि विदेशातही सक्रिय आहेत.