काश्मीर-हिमाचल-उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी

0

नवी दिल्ली । बर्फवृष्टीचे थैमान उत्तरेकडे चालू असून, त्याचा फटका महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशलाही बसला आहे. मात्र यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमधील टिहरी येथे बर्फवृष्टी सुरु आहे. श्रीनगर विमानतळ आणि जम्मू-श्रीनगर हायवे बंद करण्यात आला असून, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील काही भागाला रविवारी गारपिटीचा तडाखा बसला. यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर भारतात होत असलेल्या बर्फवृष्टीने थंडी वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहतीनुसार, गारपीटग्रस्त दोन्ही राज्यांमध्ये हवामान पूर्वपदावर येण्यास दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरच्या मैदानी भागात दोन महिने हवामान सामान्य राहिल्यानंतर सोमवारी पावसाला सुरुवात झाली.