कासारवाडी : कासारवाडीत घराजवळ पार्क केलेल्या कारला आग लागून कार पूर्णपणे जळून खाक झाली. तर अन्य एका कारला आगीची झळ लागली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास गोयल कॉम्प्लेक्स नाशिक फाटा येथे घडली. घराशेजारी पार्क केलेल्या कारने अचानक पेट घेतला. याबाबत अग्निशमन दलाला माहिती मिळताच संत तुकाराम नगर अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. परंतु यामध्ये एक कार पूर्णतः जळून खाक झाली. तर त्या शेजारी असलेल्या कारला आगीची झळ लागल्याचे दुसर्या कारचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.