कासारवाडी शाळेला रेखाकडून तीन कोटी

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथे बांधण्यात येणार्‍या शाळेच्या इमारतीसाठी राज्यसभा खासदार रेखा गणेशन यांनी तीन कोटी रूपयांची मदत देणार आहेत. इमारतीसाठी 13 कोटी 71 लाख 32 हजार 197 रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चाला स्थायी समितीने 26 डिसेंबरला मंजुरी दिली आहे. कामाची मुदत दोन वर्षांची आहे. दरम्यान, या शाळेतील मुला-मुलींच्या स्वच्छतागृहासाठी खासदार रेखा गणेशन यांनी दोन वर्षांपूर्वी 20 लाख रूपयांचा निधी दिला होता. याच पार्श्‍वभूमीवर त्यांच्याकडे नव्या इमारतीसाठी देखील निधी मिळविण्यासाठी नगरसेवक शाम लांडे यांनी आयुक्तांकडे मागणी केली होती. यानंतर त्यांनी जिल्हा नियोजन समितीला पत्र पाठवून खासदार निधीतून 3 कोटी वर्ग करण्याची सूचना केली आहे. त्यांच्याकडून निधी मिळाल्याने पालिकेचे तीन कोटी वाचणार आहे.