जळगाव। रामानंदनगर परिसरातील चंद्रमा अपार्टमेंटजवळ 7 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी वृद्धेची 22 ग्रॅम वजनाची 54 हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरून नेली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी संशयीताला ताब्यात मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला होता. न्या. ठोंबरे यांनी मंगळवारी त्या चोरट्याला रामानंदनगर पोलिसांचा अर्ज मंजूर केला आहे.
रामानंदनगरातील चंद्रमा अपार्टमेंटजवळ 7 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास विजय नारायण कदम या उभ्या असताना दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली होती. या प्रकरणी पोलिसांनी कासीम शहा गरीब शहा या न्यायालयीत कोठडीतील संशयीताला ताब्यात मिळण्यासाठी अर्ज केला होता. मंगळवारी न्यायाधीश ठोंबरे यांनी अर्ज मंजूर करून संशयीताला रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.