Daring Burglary in Kasoda Village : Thieves Make Off With 2.5 lakh Cash कासोदा : बंद घरे चोरट्यांसाठी पर्वणी ठरत असून कासोदा गावातील एका घरातून चोरट्यांनी दोन लाख 40 हजारांची रोकड लांबवल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कासोदा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर
कासोदा गावातील किराणा दुकान चालक विजय शिवाजी वारे हे गावाला गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. शुक्रवार, 28 रोजी मध्यरात्री चोरट्यांनी घरात प्रवेश करीत स्वयंपाक रूममधील डब्यातील कापडी पिशवीतील दोन लाख 40 हजारांची रोकड लांबवली. वारे हे गावाहून आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कासोदा पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एएसआय सहदेव दगडू घुले करीत आहेत.