काहीही झाले तरी एकजूट रहा; बेस्ट कर्मचाऱ्यांना राज ठाकरेंचा सल्ला

0

मुंबई- बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपाचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान आज बेस्ट कर्मचारी कुटुंबियांसह मनसे प्रमुख राज ठाकरे यांना भेटले. राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांनी न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी राज ठाकरेंनी यावेळी कर्मचाऱ्यांना काही झाले तरी एकजूट रहा असा सल्ला दिला.

संबंधित बातमी-बेस्ट-कर्मचारी संपाला मनसेचा पाठींबा; संपकरी राज ठाकरेंच्या भेटीला 

बेस्ट कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंना लिखीत स्वरुपात आपल्या मागण्या दिल्या. यावेळी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पत्नीही पोहोचल्या होत्या. कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी राज ठाकरेंसमोर आपली व्यथा मांडली. कामावर या नाहीतर वसाहतीतील खोल्या रिकाम्या करा अशी नोटीस देण्यात आली असून बळजबरीने घरे सोडण्याच्या कागदपत्रांवर सही करुन घेतल्याचा आरोप त्यांनी केला.

बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप तिसऱ्या दिवशीही कायम असल्याने मुंबईकरांचे हाल गुरुवारीही सुरूच आहेत.