भुसावळ- तालुक्यातील काहुरखेडा येथील 18 वर्षीय तरुणाचा पोहण्यासाठी गेल्यानंतर पाझर तलावात बुडाल्याने मृत्यू झाला. प्रफुल्ल अरुण वराडे (18, काहुरखेडा) असे मयत तरुणाचे नाव आहे. प्रफुल्ल सोमवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास पाझर तलावात पोहण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वरणगाव पोलिसात काहुरखेडा पोलिस पाटील खबर देणार चंद्रकांत शांताराम पाटील यांनी खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस नाईक नागेंद्र तायडे करीत आहेत.