किंग्ज इलेव्हन पंजाबचा दिल्ली डेअरडेविल्सवर 4 धावांनी विजय

0

दिल्ली :- ११ व्या सत्राच्या आयपीएलमध्ये पाचव्या किंग्ज इलेव्हन पंजाबने पाचव्या विजयाची नोंद केली. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने दिल्ली डेअरडेविल्स संघाचा 4 धावांनी पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने ८ बाद १४३ धावा काढल्या. लक्ष्याचा पाठलाग करीत दिल्ली डेअरडेव्हिल्सला ८ गड्यांच्या मोबदल्यात १३९ धावांपर्यंत मजल मारता आली. ल्युआम प्लंकेट, आवेश खान आणि ट्रेंट बोल्ट यांच्या भेदक माऱ्यासमोर पंजाबचे फलंदाज फार मोठी मजल मारु शकले नाहीत. ख्रिस गेलला विश्रांती देण्याचा निर्णय आज पंबाजच्या चांगलाच अंगलट आला. दिल्लीकडून करुण नायरने ३४ धावांची खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभी करुन देण्याचा प्रयत्न केला.आयपीएलमध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या पृथ्वी शॉने १० चेंडूंत ४ चौकार लगावत २२ धावा केल्या, परंतु तो बाद झाल्यानंतर अन्य फलंदाज झटपट माघारी परतले. श्रेयस अय्यरने ४५ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ५७ धावा केल्या. दिल्लीला ८ बाद १३९ धावांपर्यंत मजल मारता आली.

धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब : ८ बाद १४३ (करुण नायर ३४, डेव्हिड मिलर २६, लोकेश राहुल २३; लियम प्लंकेट ३/१७)
दिल्ली डेअरडेव्हिल्स : ८ बाद १३९ (श्रेयस अय्यर ५७, राहुल तेवातिया २४; अंकित रजपूत २/२३).