सेंच्युरिअन । दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये विराट कोहली तुफान फॉर्ममध्ये आहे. शेवटच्या एकदिवसीय सामन्यामध्ये कोहलीने 96 चेंडूमध्ये नाबाद 129 धावा करुन भारताचा विजय निश्चित केला. विराटचे एकदिवसीय क्रिकेटमधले हे 35वे शतक होेते. या मालिकेमध्ये विराटने 3 शतके झळकावली. विराटच्या या जबरदस्त फॉर्ममुळे भारताने एकदिवसीय मालिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेला 5-1 ने हरवले.
26 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताला दक्षिण आफ्रिकेमध्ये एकदिवसीय मालिका जिंकण्यात यश आले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका संपल्यावर विराट कोहलीने त्याच्या निवृत्तीविषयी भाष्य केले आहे. माझ्यामध्ये अजून 8-9 वर्षांचे क्रिकेट बाकी आहे. मी प्रत्येक दिवशी सर्वोत्तम कामगिरी करू इच्छीतो. मी पूर्णपणे फिट असून देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याचा मला अभिमान आहे, असे कोहली म्हणाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 6 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये विराट कोहलीने 186 च्या सरासरीने 558धावा केल्या आहे. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध 2013-14 मोसमामध्ये 6 सामन्यांच्या मालिकेमध्ये 481 धावा केल्या होत्या. त्यानंतर 1985 मध्ये वेस्ट इंडिजच्या डेसमंड हेंसने 400 धावांचा कारनामा केला. आता विराट कोहलीने आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 500 धावा केल्या आहेत. एका मालिकेमध्ये इतक्या धावा बनवणारा तो पहिला बॅट्समन ठरला आहे. कर्णधार म्हणून विराट कोहली दाखल झाला आहे.