किनगावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग : आरोपीला अटक

यावल : तालुक्यातील किनगाव येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली. योगेश समाधान कोळी (किनगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

यावल पोलिसात गुन्हा दाखल
यावल तालुक्यातील किनगाव येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आई-वडीलांसह राहते. 4 ते 14 नोव्हेंबर दरम्यान संशयीत आरोपी योगेश समाधान कोळी (किनगाव, ता.यावल) याने अल्पवयीन मुलीच्या मोबाईल क्रमांक मिळून संपर्क केला. त्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता अल्पवयीन मुलगी बसस्थानकाजवळ असतांना योगेश कोळी याने विनयभंग केला. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी योगेश कोळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहेत.