किनगावातील कामबंद आंदोलन तूर्तास मागे

0

यावल- तालुक्यातील किनगाव, अंजाळे, सावखेडासीम, दहिगाव, डांभूर्णी, बोरखेडा, हिंगोणा, सातोद, कोळवद आदी गावात ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा पगार, भविष्य निर्वाह निधीचा भरणा रखडला असून या कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे तर कर्मचार्‍यांना वेतन देण्याकामी पंचायत समितीने पुढाकार घ्यावा, अशा मागणीचे निवेदन प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांना देण्यात आले. प्रशासनाकडून निर्णय होईपावेेतो किनगाव कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन तूर्त मागे घेण्यात आला आहे. तर कर्मचार्‍यांचे प्रश्न सोेडवण्याची मागणीचे निवेदन कर्मचारी महासंघच्या वतीनेे अमृत महाजन, किशोर कंडारे, प्रल्हाद घारू, अनिल चावरे, छगन साळुंखे, नाना पाटील, अनिल चावरे, भवरलाल धंजे, पीरन तडवी आदींच्या उपस्थिती देण्यात आले.