15 हजारांचे लाकूड जप्त ; दुकान मालक पसार
यावल- तालुक्यातील किनगाव येथील सद्दाम फर्निचर या खलील शहा कादर शहा यांच्या दुकानात बेकायदा सागवान लाकूड असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने केलेल्या तपासणीत 15 हजारांचे लाकूड जप्त करण्यात आले. सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. वनविभागाच्या कारवाईनंतर दुकान मालक मात्र पसार झाले. ही कारवाई यावल वनक्षेत्रपाल एस.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुनील पाटील, शिवाजी माळी, जगदीश ठाकरे, सचिन तडवी, योगीराज तेली यांच्या पथकाने केली.