किनगावातील खलील शहा यांच्या गोदामाला पथकाकडून अखेर सील

0

धुळ्याच्या दक्षता पथकाची कारवाई ; बेकायदा सागवान प्रकरणाची कसून चौकशी

यावल- तालुक्यातील किनगाव येथील सद्दाम फर्निचर या खलील शहा कादर शहा यांच्या दुकानात बेकायदा सागवान लाकूड असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने सोमवार, 21 रोजी केलेल्या तपासणीत 15 हजारांचे लाकूड जप्त केले होते तर या कारवाईनंतर दुकान मालक पसार झाले होते मात्र त्यांच्याविरुद्ध वनविभागाने गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच पथकाने शुक्रवारी किनगाव येथे शहा यांच्या गोदामाला सील ठोकले. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान ही कारवाई विभागीय वन अधिकारी दक्षता धुळेचे उमेश वावरे, सहाय्यक वनसंरक्षक पी.आर.पाटील, वनक्षेत्रपाल यावल (पश्‍चिम) विशाल कुटे, वनक्षेत्रपाल यावल (पूर्व) व्ही.एम.पाटील, वनपाल पी.आर.जगताप, वनरक्षक शिवाजी माळी, वनरक्षक जगदीश ठाकरे, वनरक्षक संदीप पंडीत, कॉन्स्टेबल सचिन तडवी आदींच्या पथकाने केली.