किनगावात भांडणात हटकल्याचा राग : तरुणाला फायटरने मारहाण

यावल : तालुक्यातील किनगाव येथे दोन्ही भावांच्या भांडणात बोलल्याचा राग गृहीत धरून दोघांनी तरुणाने फायटरने मारहाण केली. या संदर्भात यावल पोलीसात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

भांडणात मध्यस्थी केल्याचा राग
गोरख भगवान साळुंखे (35, धम्मनगर, किनगाव) हा तरुण आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. गोरख व त्याचा चुलत भाऊ अभय साळुंखे यांचे दोघांमध्ये गुरुवार, 24 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घरगुती कारणावरून वाद सुरू होता. त्यावेळी त्यांच्या गावातील आमीन कालू तडवी आणि डेबा तडवी या दोघांनी जवळ येवून वादात पडल्याने गोरख साळुंखे यांनी ‘आमचा घरगुती वाद असून आम्ही आमचे निपटून घेवू, असा बोलल्याने त्याचा राग येवून आमीन तडवी आणि डेबा तडवी या दोघांनी चापटा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली तर एकाने लोखंडी फायटर काढून गंभीर दुखापत केली. या प्रकरणी शनिवार, 26 फेब्रुवारी रोजी रात्री गोरख साळुंखे याने यावल पोलिसात धाव घेवून तक्रार दिल्याने आरोपी आमीन तडवी आणि डेबा तडवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक संदीप सुर्यवंशी करीत आहे.