यावल : तालुक्यातील किनगाव येथे शौचालयाचे बांधकाम करण्यास गेलेल्या मजुराचा खड्यात पडल्याने मृत्यू झाला. शनिवार, 9 जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शेख भिकन नुरूद्दीन शेख (25, रा.आठवडे बाजार, पंचशील नगर, यावल) असे मयत कामगाराचे नाव आहे.
शौचालयाच्या टाकीत पडल्याने कामगाराचा मृत्यू
शनिवारी सकाळी किनगाव येथील स्टेट बँक परीसरातील रामभाऊ शिंपी यांच्या चोकअप झालेल्या शौचालयाच्या कामासाठी शेख भिकनसह पाच मजूर गेले होते. काम सुरू असताना शेख भिकनचा पाय घसरला व तो मैल्याच्या टाकीत जावून पडला व त्याचवेळी त्याच्या अंगावर भिंत कोसळली. सुमारे तासाभरानंतर त्यास बाहेर काढण्यात यश आले मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. भिकन यास यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन देशमुख यांनी त्यास मृत घोषित केले.