यावल- तालुक्यातील किनगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती महाजन यांच्यासह ग्रामविकास अधिकारी भास्कर रोकडे यांनी 2016 मध्ये 14 व्या वित्त आयोगातून गावासाठी मंजूर निधीतून तब्बल 19 लाख 25 हजार 50 रूपयांचा अपहार केला होता. यापूर्वीच सरपंचांना अटक झाली असलीतरी आरोपी ग्रामविकास अधिकारी पसार झाले होते. त्यांना रविवारी रात्री यावल पोलिसांनी अटक केली आहे.
संगनमताने केला दोघांनी केला अपहार
सरपंच ज्योती महाजन यांच्यासह ग्रामविकास अधिकारी भास्कर रोकडे यांच्याविरुद्ध नोव्हेबर 2017 मध्ये यावल पोलिसात अपहाराचा गुन्हा दाखल झाला होता तर उभयंतांनी 19 लाख 25 हजारांवर डल्ला मारल्याचा आरोप होता. संशयीतांना न्यायालयाने अटकपूर्व जामीनदेखील फेटाळला होता. 2016 मध्ये 14 व्या वित्त आयोगातुन गावात विविध विकास कामां करीत शासनाकडून निधी उपलब्ध झाला होता. त्यात 28 जानेवारी 2016 ते 1 ऑक्टोंबर 2016 दरम्यान तत्कालीन ग्रामविकास अधिकारी भास्कर चंद्रभान रोकडे यांनी सरपंच ज्योती अशोक महाजन यांच्या सोबत संगनमत करून वित्त आयोगातील 19 लाख 25 हजार 50 रूपयांचा निधीचा नेमून दिलेल्या कामाकरीता उपयोग न करता स्वत:च्या फायद्याकरीता वापर केल्याने ग्रामपंचायत सदस्य टिकाराम चौधरी यांनी तक्रारी केली होती. त्याची दखल जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व नंतर नासिक विभागीय आयुक्तांनी घेतली होती. ग्रामविस्तार अधिकारी संजय तुळशिराम मोरे यांच्या फिर्यादीवरून शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पोलीस निरीक्षक
डी.के.परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक अहिरे, हवालदार संजय तायडे, संजीव चौधरी करीत आहे.