किनगाव गावातून चोरट्यांनी दुचाकी लांबविली

यावल : तालुक्यातील किनगाव येथील सरकारी दवाखान्याजवळून तरुणाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली. याबाबत यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरट्यांचा मोर्चा आता ग्रामीण भागाकडे
उमेश सुरेश बाविस्कर (30, पूनगाव, ता.चोपडा) हा तरुण मोलमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. 24 मे रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास उमेश बाविस्कर हा दुचाकीने यावल तालुक्यातील किनगाव येथे आला व त्याने आपली दुचाकी (एम.एच.19 डी.डी. 3417) गावातील सरकारी दवाखान्याजवळ त्याने दुचाकी पार्क केली मात्र चोरट्यांनी संधी साधत दुचाकी लांबवली. सोमवारी सकाळी 11 वाजता यावल पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रारीनंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.