किनगाव ग्रामपंचायतीवर महिलांचा हंडा मोर्चा

0

यावल– उन्हाळ्यापूर्वीच तालुक्यातील किनगाव बुद्रुक गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील दोन महिन्यांपासून नादुरूस्त जलवाहिनीमुळे पुरेशा प्रमाणावर पाणीपुरवठा होत नसल्याने गावातील रामराव नगर व आत्माराम नगर भागातील संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. या मोर्चाची दखल घेत पंचायतीकडून तत्काळ जलवाहिकेचे काम सुरू करण्यात आले आहे. याबाबत वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनदेेखील प्रश्न सोडवला जात नव्हता तेव्हा संतप्त महिलांनी सोमवारी सकाळी नऊ वाजता शेकडोच्या संख्येत हंडा मोर्चा काढत ग्रामपंचायतकार्यालयावर मोर्चा धडकला. सरपंच राजु पिंजारी, ग्रामविकास अधिकारी बी.पी. यहीदे,पं.स.चे उपसभापती उमाकांत पाटील, संजय पाटील, गंगाबाई विष्णू महाजन, टिकाराम चौधरी आदींनी महिलांना लेखी हमी घेतल्यावर मोर्चेकरी माघारी
फिरले.