किन्ही शिवारात अनोळखीचा मृत्यू

0

भुसावळ- तालुक्यातील किन्ही शिवारातील एमआयडीसी परीसरात 60 ते 65 वर्षीय अनोळखीचा मृतदेह आढळल्याची घटना 30 रोजी दुपारी 2.15 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी किन्ही पोलिस पाटील राजेंद्र चिंधू तायडे यांनी खबर दिल्यावरून तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ढाके बंधूंच्या मंदिराच्यामागे अनोळखीचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी धाव घेतली. अनोळखीचा नेमका कशामुळे मृत्यू झाला याबाबत कारण कळू शकले नाही. तपास हवालदार रीयाज शेख करीत आहेत.