किम जोंग ट्रम्प यांच्या भेटीसाठी सिंगापुरात दाखल

0

सिंगापूर-अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांची १२ जून रोजी सिंगापूर येथे ऐतिहासिक भेट होणार आहे. या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भेटीसाठी किम जोंग उन रविवारी चिनी विमानाने सिंगापूरला पोहोचले. उत्तर कोरियाच्या एखाद्या नेत्याने विमान प्रवास करून परदेशात जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. डोनाल्ड ट्रम्प हे देखील लवकरच सिंगापूरला रवाना होणार आहे.

ट्रम्प व किम हे सिंगापूरमधील सेनटोसा या लहानशा बेटावर भेटणार असून, १२ जूनची शिखर परिषद ही उत्तर कोरिया व अमेरिका यांच्यातील पहिलीच बैठक आहे. जी-7 संमेलनात नाराज होऊन घरी परतलेले ट्रम्प यांनीही सिंगापूर समिटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सिंगापूर दौऱ्यात आपल्याला खूप मोठ्या अपेक्षा आहेत. निश्चितच चर्चेचा दिवस माझ्यासाठी खास असेल. किम यांनी या भेटीसाठी खूप मेहनत घेतली आहे.