A knife attack on a young man in Bhusawal : A crime against both भुसावळ : शहरातील खडका रोडवरील हिरा हॉलजवळ तरुणावर काही एक कारण नसताना चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता घडली होती. या प्रकरणी दोघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
चाकूहल्ल्याने उडाली खळबळ
तक्रारदार शेख रईस शेख रशीद (२५, मुस्लीम कॉलनी, भुसावळ) यांच्यावर संशयीत फईम शेख उर्फ पिंटू मामा व हनीफ शेख उर्फ सद्दाम (दोन्ही रा.मुस्लीम कॉलनी, भुसावळ) यांनी काही एक कारण नसताना शिविगाळ करीत मारहाण करून शेख रईस यांच्या मांडीवर तसेच कमरेखाली चाकूने हल्ला करीत जखमी केले.
संशयीतांचा पोलिसांकडून शोध
या हल्ल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेख रईस यांनी उपचार घेतल्यानंतर बाजारपेठ पोलिसात शनिवारी धाव घेत तक्रार नोंदवल्यानंतर दोघा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक तुषार पाटील करीत आहेत.