किरकोळ कारणावरून आई व मुलास मारहाण

0

भुसावळ- तालुक्यातील वरणगावजवळील कपिलवस्ती नगरातील आई व मुलास मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. वरणगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कौशल्याबाई अशोक जमदाडे (53, रा.कपिल वस्ती नगर) यांचा मुलगा गौतम हा घरासमोरील चौकात उभा असताना निर्मलाबाई पानपाटील, प्रकाश उर्फ दौलत पानपाटील, गोलू जितू तायडे या तिघांनी गौतम जमदाडे याची आई कौशल्याबाई यांच्या अंगावर धावून शिवीगाळ करून मारहाण केली तसेच गोलू तायडे याचा मामा प्रकाश याला बोलावून त्याने ब्लेडने गौतमच्या हातावर वार केले. यात गौतम व कौशल्याबाई दोघे जखमी झाले. कौशल्याबाई जमदाडे यांच्या फिर्यादीवरून तिघा आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संदीप बडगे करीत आहेत.