किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूने हल्ला

0

भोसरी : किरकोळ कारणावरून दोनजणांनी मिळून तरुणावर चाकूने हल्ला केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि. 14) दुपारी साडेतीनच्या सुमारास सुमा गोडाऊन चौक पांजरपोळ येथे घडली. किशोर रमेश मोहिते (वय 29, रा.भोसरी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार मनोहर बापू मोहिते, अजय मगन मोहिते (रा.गोडाऊन चौक, पांजरपोळ मागे, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किशोर आणि आरोपी यांच्या लहान मुलांची किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. त्यावरून आरोपींनी संगनमत करून किशोर यांच्यावर चाकूने हल्ला केला. यामध्ये किशोर यांच्या बोटाचा पेर तुटले. तसेच आरोपींनी किशोर यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. किशोर यांच्या पत्नीलाही शिवीगाळ करत मारहाण केली. यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.