जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथील 25 वर्षीय तरुणीला किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवार, 5 मे रेाजी दुपारी तीन वाजता घडली. याप्रकरणी शुक्रवार, 6 मे रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा
जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील खालची अळी येथील रहिवासी सुचिता सचिन चौधरी (25) या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून गुरुवार, 5 मे रोजी दुपारी तीन वाजता घरी असतांना किरकोळ कारणावरून हरीष पुरूषोत्तम येवेले, उज्ज्वला हरीष येवले (खालची अळी, नशिराबाद) यांनी शिविगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी तरुणीने नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर संशयीत आरोपी हरीष पुरूषोत्तम येवले, उज्ज्वला हरीष येवले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे करीत आहे.