किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण

0

जळगाव । किरकोळ कारणावरून नवनाथ चौकातील एका महिलेला पाच जणांना मारहाण करून दामदाटी केल्याची घटना 3 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेनुसार पाच जणांविरोधात रामानंद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरिवि÷ठ्ठल नगरातील नवनाथ चौक येथील रहिवाशी प्रियंका बळराम बनसोडे व सुवर्णा शिवाजी बोरसे या दोघा महिलेचे घर भिंतीलाभिंत आहे. 3 मे रोजी सांयकाळी 7.30 वाजेच्या सुमारास सुवर्णा बोरसे यांनी मांजरीची नाळ गटारीत टाकल्याने प्रियंका बनसोडे यांना जाब विचारला. याचे वाईट वाटून सुवर्णा बोरसे यांनी प्रियंका यांना घरातून ओढताण केली तर सुनंदा दगडू कोळी, मनोज दगडू कोळी, पंकज मराठे आणि बंटी सपकाळी यांनी शिवीगाळ करत दामदाटी केली. प्रियंका बनसोडे यांच्या फिर्यादीवरून रामानंद पोलीसात वरील पाचही अरोपींविराधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ विजय निकुंभ करित आहे.