A Stone Was Thrown On The head Of a Youth Who Went to Settle a Dispute : Crime Against Four जळगाव : एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोरच तरुणाच्या डोक्यात चौघांनी दगड टाकला. ही घटना सोमवारी सकाळी 11 वाजता घडली. किरकोळ वादावरून समजविण्यासाठी गेल्यानंतर ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.
वाद मिटवताना डोक्यात टाकला दगड
शहरातील शिरसोली रोडवरील डीमार्ट समोर सईद शहा सलीम शहा हा आपल्या परीवारासह राहतो. मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवार, 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सईद शहा हा एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोर किरकोळ वाद समजवण्यासाठी गेला असता त्याला खलील शहा गुलाब शहा, आसीसफ शहा लतिफ शहा, अरबाज शहा लतिफ शहा आणि समीर शहा खलिल शहा (सर्व रा.फुकटपुरा, जळगाव) या चौघांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोर सईद शहाला शिवीगाळ करून बेदम मारहाण करून जखमी केले. या संदर्भात सोमवारी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.