किरकोळ वादातून दाम्पत्याने केली तरुणाला मारहाण

जळगाव : कौटुंबिक वादानंतर दाम्पत्याला तरुणाला मारहाण केल्याची घटना शहरातील राजीव गांधी नगरात घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
राजीव गांधी नगरात शेखर रघुनाथ ससाणे (34) हे वास्तव्यास असून ते पेंटरकाम करुन आपला उदरनिर्वाह भागवितात. याच परीसरात त्यांचा भाऊ राजेंद्र रघुनाथ ससाने हा सुध्दा कुटुंबासह वास्तव्यास आहे. सोमवार, 9 मे रोजी राजेंद्र ससाने व त्यांची पत्नी गीता ससाने या दोघांनी कौटुंबिक कारणावरुन शेखर ससाने यास चापटा-बुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत राजेंद्र याने शेखर याला रॉड मारण्यात आल्याने त्यास दुखापत झाली. या प्रकरणी शेखर ससाने याने दिलेल्या तक्रारीवरुन त्याचा भाऊ राजेंद्र व वहिनी गीता ससाने या दोघांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक प्रशांत पाठक करीत आहे.