किरकोळ वादातून दोघांचे डोके फोडले

0

जळगाव । अनोळखी वयोवृद्धाने नेरी नाक्याच्या पानटपरीवर किरकोळ वादातून दगडफेक करून दोघांना जखमी केल्याची घटना सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली असून दोघांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सागर मधूकर भंगाळे (वय-35, रा. कासमवाडी) व दिपक पाटील (वय-42, रा. मेस्को मातानगर) हे दोन्ही मोटारसायकलवर नेरी नाक्याजवळ आले. तेथील पानटपरीव तंबाखूची पुडी घेण्यासाठी जात असतांना एक अनोळखी वयोवृद्ध व्यक्ती त्या ठिकाणी येवून शाब्दिक चकमच झाली. त्यानंतर किरकोळ कारणावरून भांडण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर वयोवृद्धाने दगड मारण्यास सुरूवात केली. या हाणामारीत तिघेजणांच्या डोक्याला मार लागल्याने जखमी झाले. यातील सागर भंगाळे आणि दिपक पाटील हे दोघी जखमी झाले. दोघांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.