किरकोळ वादातून मुक्तळला पिता-पूत्रांना मारहाण

बोदवड : तालुक्यातील मुक्तळ येथे किरकोळ वादातून पिता-पूत्रांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तिघा भावंडांविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
निलेश दिलीप बाविस्कर (26, मुक्तळ) यांच्या फिर्यादीनुसार, 10 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संशयीत आरोपींनी फिर्यादीसह त्यांचे वडिल दिलीप बाविस्कर यांना लग्नातील बोलचालीसह भांडणाच्या कारणावरून शिविगाळ करीत मारहाण केली तसेच निलेश यांच्या उजव्या दंडाला आरोपी हरीदासने चावा घेतला. या प्रकरणी हरीदास लक्ष्मण बावस्कर, माणिक लक्ष्मण बावस्कर, सुधाकर लक्ष्मण बावस्कर (सर्व रा.मुक्तळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक संदीप वानखेडे करीत आहेत.