किरण बेदी यांनी फिफा वर्ल्ड कपच्या ‘पुद्दुचेरी’यांना दिल्या शुभेच्छा

0

नवी दिल्ली- फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना फ्रान्स विरुद्ध क्रोएशिया या संघांमध्ये झाला. फ्रान्सने यात विजय मिळविला. सोशल मीडियावर अनेकांनीच फ्रान्सच्या संघाला शुभेच्छा दिल्या. भारतातूनही अनेकांनीच ट्विट करत विजय साजरा केला. पण पुद्दुचेरीच्या (पाँडिचेरि) उपराज्यपाल किरण बेदी यांचे ट्विट वेगळेच होते. त्यांनी पुद्दुचेरीच्या नागरिकांना फिफाच्या विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

फ्रान्स वसत्यांमुळे पुद्दुचेरीवर असणारा फ्रेंचांच्या प्रभावाकडे लक्ष वेधत त्यांनी याचं थेट नातं पुद्दुचेरीशी जोडलं आणि पुद्दुचेरीवासियांनाबही या विजयाच्या शुभेच्छा दिल्या. त्यासोबत फ्रान्सच्या संघातील खेळाडूंमध्ये असणाऱ्या विविधतेविषयीसुद्धा त्यांनी ट्विट केलं. पण, त्यांचं हे ट्विट अनेकांनाच खटकलं.