जळगाव : जळगाव शिवारातील शिवाजी नगरातील बंद किराणा दुकान फोडून 90 हजारांची रोकड लांबवण्यात आली होती. या प्रकरणी जळगाव गुन्हे शाखेने त्रिकूटाच्या मुसक्या आवळलया आहेत. शंकर विश्वनाथ साबणे, गौरव जगन सांळुखे व महेश संतोष लिंगायत (गेंदालाल मिल परीसर, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
जळगाव शहरातील शिवाजी नगर भागात आनंद नागला यांचे मदनलाल पांडुरंग नागला या नावाचे किराणा दुकान आहे. या दुकानाचे शटर उचकवून त्यातील 90 हजार रुपये रोख रक्कम लांबवण्यात आली होती. या प्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गु.र.न.210/22 भा.द.वि. 380, 457 नुसार गुन्हा दाखल होता. अट्टल गुन्हेगार शंकर साबणे याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना कळताच त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, पोलिस नाईक नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, विजय पाटील, अविनाश देवरे आदींच्या पथकाने शंकर विश्वनाथ साबणे यास ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत या चोरीत गौरव जगन सांळुखे व महेश संतोष लिंगायत यांचा देखील सहभाग असल्याचे कबुल केल्याने तिघा आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात अधिक कारवाईसाठी सोपवण्यात आले.