किर्तनकार महाराजांनी वाचविले कोल्ह्याचे प्राण

0

पहूर । जामनेर तालुक्यातील लोंढी येथील शेतकरी गजानन भागवत महाराज हे आपल्या चिंचखेडा शिवारात शेतात गेले असता, शेतातील कामगिरी आटोपून पाणी पिण्यास विहिरीजवळ गेले. पाणी काढण्यास बालटी विहिरीत सोडली असता, पाण्यात काहीतरी असल्याची भिती त्यांना वाटली. मध्येच पाणी ओढणे थांबवून त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता, त्यांना विहिरीच्या कपार तोंडावर एक प्राणी दिसला. नेमका तो प्राणी कोणत्या जातीचा होता हे त्यांना विहिरीच्या खोलाईवरुन कळू शकले नाही. पण सदरच्या प्राण्याला बाहेर कोण काढणार म्हणून जवळच असलेल्या नंदलाल भागवत, सुनिल भागवत यांची मदत घेवून वनअधिकारी जामनेर कार्यालयाशी संपर्क साधून घेण्यासाठी पहूर येथील दिलीप बावस्कर यांच्याशी संपर्क साधला.

वनअधिकार्‍यांना बोलावून केले स्वाधीन

मागील महिन्यात पहूर येथे मोकाट वानराने अनेकांना चावा घेवून जखमी केले होते. त्यानुसार त्यांच्याजवळ वनपालक कार्यक्षेत्राचा ध्वनिक्रमांक होता. त्यानुसार त्यांच्याशी संपर्क होताच वनअधिकारी व कर्मचारी वनपाल जामनेरचे के.पी.कानळदे, जीवनसिंग पाटील, आनंदा ठाकरे, गोपाल शिसोदे यांचे पथक काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विहिरीत फास ठाकून सदरच्या प्राण्यास किर्तनकार महाराज व त्यांच्या सहकार्‍यांसह त्या प्राण्यास काही एक ईजा न होवू देता बाहेर काढले. कोल्ह्या जातीचा मादी असल्याचे त्यांनी सांगितले. वनपालमध्ये हे कोल्ही असल्याचा निर्वाळा त्यांनी देवून जामनेर वनपालमध्ये जमा केले. सदरच्या प्राण्याची महिती त्यांना दिल्यामुळै वनपाल अधिकार्‍यांनी गजानन महाराज यांना त्यांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले.