किलर रोबोट विरोधात वैज्ञानिकांची एकजूट

0

रोबो व आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान यांच्या संयोगावर आणखी संशोधन करण्याची गरज व्यक्त होत असतानाच हे अत्याधुनिक तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे दुष्परिणाम चिंताजनक असल्याने जगभरातील वैज्ञानिकांनी संयुक्त राष्ट्रसंघाकडे खुले पत्र लिहून अशा रोबोंच्या निर्मितीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मेलबर्न येथे सोमवारी भरलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आंतरराष्ट्रीय संयुक्त परिषदेत जगभरातील तज्ञ जमले होते तेव्हा ही मागणी केली गेली.

किलर रोबचा वापर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने घातक शस्त्र म्हणून केला जाईल या शंकेने बंदीची मागणी केली गेली आहे. या रोबोंचा शस्त्र म्हणून वापर करून लक्षावधी निरपराध नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. या वैज्ञानिकांत एआय तंत्रज्ञानातील अग्रणी टॉबी वॉल्श, टेस्लाचे अ‍ॅलन मस्क, चीनी युबीटेकचे जेम्स चो यांचा समावेश आहे. हे रोबो एकदा तयार झाले की त्यांवर बंदी आणणे अवघड होणार आहे व हुकुमशहा, दहशतवादी यांच्याकडून या रोबोंचा वापर निर्दोष लोकांविरूद्ध केला जाईल असे या तज्ञांचे म्हणणे आहे.