कीर्तनकार शास्त्री यांची आत्महत्या 

0
आळंदी : ज्ञानेश मिशन संस्थेचे खजिनदार व कीर्तनकार संस्थेचे शिक्षक प्रभाकर महाराज शास्त्री  शिंदे (वय 54) यांनी संस्थेच्या आवारात  उपरण्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या  केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. आसाराम धुराजी गरड (रा.देहू फाटा) यांनी  फिर्याद दिली. ही घटना मंगळवारी सकाळी  घडली. ज्ञानेश्‍वर मिशन संस्थेचे खजिनदार प्रभाकर शास्त्री महाराज यांनी राहत्या घरी गळफास  लावून आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास घरच्या मंडळींनी त्यांच्या खोलीत पाहिले असता खोलीतील पंख्याला त्यांचा मृतदेह  लटकलेला आढळून आला. आळंदी पोलीस  हवालदार नितीन बनकर पुढील तपास करीत  आहेत.