ग्राहकांना दिली जाते रोपांची भेट
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात प्रत्येक नागरिकास पर्यावरण संवर्धनाच्या सकारत्मक जनजागृतीसाठी पोषक वातावरण निर्माण करू लागला आहे. यासाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिका आणि शहरातील सरकार नोंदणी कृत संस्था यशस्वी होताना दिसत आहेत. आपल्या शहरातील विद्यार्थी 100 टक्के सहभागी आहेतच पण शहरातील व्यावसायिकही पर्यावरण संवर्धनात सहभागी झाल्याच्या घटना रोज अनुभवण्यास मिळत आहेत. नुकतेच कुंदन होंडाई येथे कार सर्व्हिसिंगला दिली होती. जेव्हा मी माझे वाहन परत घेण्यासाठी गेलो तेव्हा त्या होंडाई व्यवस्थापनाने मला भेट वस्तू म्हणून एक रोप दिले. मलाच धन्यवाद देऊन ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा मला सल्ला दिला. याविषया बाबत चौकशी केल्यावर कळले की, कंपनीत येणार्या प्रत्येक कस्टमरसाठी एक रोप भेट म्हणून दिले जाते.
वृक्षसंवर्धन होण्यासाठी हा उपक्रम
यावेळी हुंड्याई कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले की, कंपनीकडून एक भेटवस्तू देण्याबाबत नेहमी पुढाकार घेतला जातो. गाड्या घेतल्यावर ग्राहक विविध कामांसाठी येत असतात. भेटवस्तू देऊन खुश करण्यापेक्षा झाडांचे रोप देण्याचा विचार ठरला. त्यामुळे आता आम्ही आलेल्या सर्वच ग्राहकांना रोप देण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी तसेच वृक्षसंवर्धन होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. इसिएचे संचालक विकास पाटील म्हणाले की, इसिए राबवीत असलेली पर्यावरण संवर्धन संकल्पना शहरतील प्रत्येक नागरिकाच्या गळी उतरताना दिसत आहे. शहरात जर ही प्रथा मोठ्या व्यावसायिकांनी जर अवलंबली तर महापालिकेच्या उद्यान विभागावरील अतिरिक्त कामाचा भार कमी होईल. शहरतील मॉल, आणि सर्व वाहन विक्रेते तसेच मोठ्या शोरूम मधून ही प्रथा सुरु झाली तर आपले शहर एक वर्षात हिरवेगार होईल.