मुंबई । भारतीय संघाच्या मुख्य परिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर सर्व स्तरातून कोहलीच्या वागणुकीवर टीका केली जात आहे. याचबरोबर अनेक दिग्गंज माजी क्रिकेटपटू कुंबळेच्या बाजुने उभे राहिले आहे. त्यांनी विराटलाच दोषी धरले आहे.मात्र भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधर यांनी कुंबळे बाजी न घेता रवीशास्त्रीची बाजु धरली आहे.त्यांना पाठींबा दर्शवला आहे.
श्रीधर यांनी कुंबळें ऐवजी रवी शास्त्री संघासाठी आवश्यक असल्याचे एका मुलाखतीत म्हटले आहे.कुंबळे व शास्त्री यांच्या कार्यशैलीचा फरक आहे. त्यावर बोलतांना ते म्हणाले की, रवी शास्त्री सरावादरम्यान खेळाडूंचा स्वभाव, त्यांचा खेळाप्रती असलेला दृष्टीकोन या गोष्टी विचारात घेतात. तोच दृष्टीकोन मैदानात घेऊन खेळाडू सामना कसे जिंकवून देऊ शकता यावर शास्त्री यांचा नेहमी भर असतो. मात्र कुंबळे यांचा स्वभाव हा शास्त्रींच्या नेमका विरुद्ध आहे. मैदानात यश मिळवण्यासाठी आपण सांगतोय त्याच पद्धतीचा वापर व्हावा, असा कुंबळेंचा कल होता. शास्त्री व कुंबळे या दोन्ही वेगळ्या व्यक्ती आहे.ते एकसारखेच वागावे अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे,असे श्रीधर म्हणाले. सध्या खेळाडूंमधल्या उर्जेचा वापर करुन घेणे गरजेचे आहे. त्यांची ग्रहणशक्ती कशी आहे याचाही विचार झाला पाहिजे. जरी आपले म्हणणे पटत नसेल तरी चांगल्या कामगिरीसाठी आपल्या विचारांना बाजुला ठेवावे लागते.असे म्हणून श्रीधर यांनी कुंबळेच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्हक निर्माण केले आहे.