नवी दिल्ली : युनेस्कोकडून कुंभमेळ्याला ‘मानवतेचा सांस्कृतिक वारसा’ हा दर्जा देण्यात आला आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी दिली आहे. भारतामध्ये हिंदूंचा सगळ्यात मोठा तीर्थमेळा कुंभमेळा मानला जातो. हिंदू धर्मामध्ये कुंभमेळ्याला धार्मिक महत्व दिले जाते.
म्हणून कुंभमेळ्याला हा दर्जा देण्यात आला आहे. यावर्षी युनेस्कोकडून 11 देशांच्या विविध सांस्कृतिक वारसाला हा दर्जा देण्यात आला आहे. यात 11 देशांचे खेळ, शिल्प, कौशल्य, संगीत आणि वाद्ययंत्र यांचा समावेश केला गेला आहे. ज्या देशांमध्ये ज्या गोष्टीला सगळ्यात जास्त सांस्कृतिक महत्व दिले जाते अशा देशांच्या सांस्कृतिक वारसाचा अभ्यास करून युनेस्कोने हा दर्जा दिला आहे.