कुंभश्री स्कॉलरशिपच्या मदतीने मुले बनली इंजिनियर

0

नवापूर (हेमंत पाटील) । येथील हातावर पोट भरणार्‍यांची चार मुले राष्ट्रीय पत्रिका मासिक कुंभश्रीच्या परत फेड बिन व्याजी स्कॉलरशिप योजनेतून भरीव आर्थिक मदत प्राप्त झाल्याने स्वप्नवत वाटणारे इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून नोकरीस ही लागले आहेत. ही किमया घडून आली कुंभश्री मासिकचे संपादक इंजि.संजय राजे आणि संचालिका बिनाबेन राजे ह्यांच्या पाच वर्षापूर्वी केलेल्या खान्देश दौर्‍यामुळे घडून आली आहे. त्यावेळी येथील कुंभारवाड्यातील कार्यक्रमात इंजि.बबनराव जगदाळे ह्यांनी ओळख परिचय करतांना नेहल अरविंद प्रजापती, मितेश धनजी प्रजापती, राहुल धर्मेश प्रजापती आणि मयंक सुमन प्रजापती ही मुले हुशार असून आर्थिक विवंचनेमुळे इच्छा असून पालक त्यांना बाहेरगावी इंजिनियरिंगला पाठवू शकत नाही,कृपया आपण मदत करावी अशी विनंती केली.

नाशिक येथील इंजिनिअरींग कॉलेजला दिला प्रवेश
चारही मुलांना इंजि.बबनराव जगदाळे ह्यांनी नाशिकला घेऊन जाऊन इंजिनियरींग कॉलेजला प्रवेश घेतले. चारही मुलांच्या कॉलेज प्राचार्याना इंजि. संजय राजे ह्यांनी धनादेश पाठवून दिले. मुलांनी कुंभश्रीने देऊ केलेल्या संधीचे सोने करत आपल्या आईवडिलांचे आणि स्वतःचे इंजिनियर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. चौघापैकी तीन मुले नोकरीस लागली असून इंजि. नेहल अरविंद प्रजापती ह्याने कंपनीत जादा काम करीत कुंभश्रीचे वर्षाभरातच तब्बल नव्वद हजार रुपये प्रतिनिधी संगिता जगदाळे ह्यांचाकडे चेक देऊन कुंभश्रीस परत केले. इंजि.नेहल आणि त्याच्या आई हेमाबेन आणि वडिल अरविंद प्रजापती यांनी याप्रसंगी आभार मानले.