कुंभ मेळाव्याला जाणार्या प्रवाशांना दिलासा ; मेल, एक्स्प्रेस गाड्यांना नैनीसह विंद्याचल स्थानकावर थांबा
भुसावळ- कुंभ मेळाव्यासाठी जाणार्या प्रवाशांची गैरसोय टळण्यासाठी मध्य रेल्वेने मेल व एक्स्प्रेस गाड्यांना नैनी तसेच विंद्याचल रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्वावर 13 ते 23 जानेवारी तसेच 2 ते 21 फेब्रुवारी दरम्या थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे..
नैनी स्थानकावर या गाड्यांना थांबा
11067 व 11068 लोकमान्य टिळक टर्मिनस-फैजाबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस साकेत एक्सप्रेस, 18610 व 18609 लोकमान्य तिलक टर्मिनस-रांची-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 11055 व 11056 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस गोदान एक्सप्रेस, 11059 व 11060 लोकमान्य टिळक टर्मिनस-छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 11071 व 11072 लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी-लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्सप्रेस, 11045 व 11046 श्री छत्रपतीत शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर)-धनबाद- श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) दीक्षाभूमि एक्सप्रेस 12165 व 12166 लोकमान्य तिलक टर्मिनस-वाराणसी-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस, 22103 व 22104 लोकमान्य टिळक टर्मिनस-फैजाबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 22131 व 22132 पुणे-मंडुआडीह-पुणे एक्सप्रेस, 11033 व 11034 पुणे-दरभंगा-पुणे एक्सप्रेस, 15268 व 15267 लोकमान्य टिळक टर्मिनस-रक्सौल-लोकमान्य तिलक टर्मिनस जनसाधारण एक्सप्रेस, 22129 व22130 लोकमान्य तिलक टर्मिनस-अलाहाबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस तुलसी एक्सप्रेस, 11053 व 11054 लोकमान्य टिळक टर्मिनस-आजमगढ़-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस या गाड्यांना नैनी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
विंद्याचल स्थानकावर या गाड्यांना थांबा
12167 व 12168 लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 12336 व 12335 लोकमान्य टिळक टर्मिनस-भागलपुर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 15645 व 15646 लोकमान्य टिळक टर्मिनस-गुवाहाटी-लोकमान्य टर्मिनस एक्सप्रेस, 15647 व 15648 लोकमान्य तिलक टर्मिनस-गुवाहाटी-लोकमान्य टिळक टर्मिनस (वाया मालदा) एक्सप्रेस या गाड्यांना प्रायोगिक तत्वावर एका मिनिटासाठी थांबा देण्यात आला.