नंदुरबार । दोन्ही महिलांच्या भांडणात पडून वकिलीपदाचा गैरवापर करून मराठे कुटुंबियांना धमकवणार्या त्या वकिलाची सनद रद्द करण्यात यावी, अशी मागणी मराठा समाजातर्फे पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे, त्यात म्हटले आहे की, 13 नोव्हेंबर रोजी संजयनगरमध्ये पाणी भरण्याच्या कारणावरून रत्नबाई भोई व अनिताबाई मराठे यांच्यात वाद झाला. यावेळी वकील असलेले राजेंद्र मोरे यांनी भांडणात पडून अनिता मराठे यांच्या अंगावर धावून शिवीगाळ केली,लज्जावाटेल असे वर्तन केले. अनिता मराठे यांचे पती धाकु मराठे यांना बेदम मारहाण करून जखमी केले व पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. तसेच गल्लीतील या आपसी भांडणाचा वाद बार असोसिएशन कडे नेऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षर्या
वकिली पदाचा गैरवापर करणार्या या वकिलाची सनद रद्द होऊन कारवाई करण्यात यावी. अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेन असा इशारा पोलिस अधीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी शाम मराठे, अरुण मराठे, धाकु मराठे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.