जळगाव : रस्त्यात आलेल्या कुत्र्याला वाचविणाच्या नादात कारच्या धडकेत चोपडा तालुक्यातील दुचाकीस्वार तरूण जागीच ठार झाला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात
जळगाव तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील आमोदा ते कानळदा दरम्यान असलेल्या डॉक्टर प्रताप जाधव यांच्या शेतात समोर रस्त्यावर कुत्रा आल्याने त्याच्या वाचविण्याच्या प्रयत्नात असलेला दुचाकी (एमएच १९ एएफ ००३७) वरून जात असलेला गोपाळ ज्ञानेश्वर चौधरी (वय-२३, रा. तावसे बुद्रुक ता. चोपडा जि.जळगाव) तरुण दुचाकीवरून रोडावर पडला. गाडीवरून खाली पडल्यानंतर उठण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या पाठीमागून भरधाव वेगाने येणार्या अज्ञात कारने जोरदार धडक दिली. यात गोपाळ चौधरी हा जागीच ठार झाला. मयत गोपाळ चौधरी हा चहा विक्री करण्याचा व्यवसाय करत होता. यासंदर्भात सोपान सुभाष पाटील (वय-३८) रा. आव्हाने ता. जि. जळगाव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात कार चालकाविरोधात शनिवार, २६ फेब्रुवारी रोजी दुपारी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश हारनोळ करीत आहे.