कुदळवाडी स्पोर्ट्स क्लबतर्फे चिखलीत व्हॉलीबॉल स्पर्धा

0

भोसरी : कुदळवाडी स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने डे नाईट ऑल इंडिया व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन चिखली येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कामगार नेते कैलास कदम, माथाडी कामगार इरफान सय्यद, नगरसेवक संजय नेवाळे, राहुल जाधव, वसंत बोराटे, कुंदन गायकवाड, विशाल यादव, संदीप मारेपाटील, लतीफ खान, देवानंद गुप्ता, नियाज सिद्दीकी, मालाराम चौधरी, याकूब खान आदी उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाकीब खान,परवेज सिद्धीकी,आफताब खान, प्रवीण मौर्या, मकसूद कपूर, अश्फाक सिद्धीकी, मनोज गुप्ता, मेहताब खान, जमिरुउल्ला चौधरी, मुजाफर सिद्धीकी, एजाज चौधरी आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाकीब खान यांनी तर आभार साबीर खान यांनी मानले.