श्रीनगर-जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे भारतीय लष्कराकडून चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. सुरक्षारक्षकांनी आज पहाटे कुपवाडा जिल्ह्यातून चार दहशतवाद्यांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेले दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. याबाबतची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. त्यानुसार योजना आखून सुरक्षारक्षकांनी घुसखोरी करण्याच्या प्रय़त्नात असणाऱ्या सात दहशतवाद्यांना घेरले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला, दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी देण्यात आली त्यावेळी चार जणांनी शरणागती पत्करली. पण गोळीबार सुरू असताना तीन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. सध्या परिसरात पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. तर, अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी हे नवखे असल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.