पाचोरा । पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील युवकाचा संशयास्पद मृत्युस कारणीभूत ठरणार्या दोषींवर कायदेशीर कारवाई करावी तसेच मृतांच्या आई-वडिलांना दबावात जबाब घेतल्यानेया प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी अशी मागणी मराठा समाजातील विविध संघटनानी केली आहे. मृत अमोल नाना पाटील वय 20 हा वाळुच्या ट्रॅक्टरवर कामाला जातो असे सांगुन गेला मात्र सकाळी त्याचा मृत्यु झाला. मागणीसाठी विविध संघटना 5 जूनला उपोषणास बसणार आहे मागणीचे नवेदन पाचोर्याचे ए.पी.आय सचिन सावंत यांना देण्यात आले. या सचिन सोमवंशी, दपक पाटील, एस.के.पाटील, राजेंद्र पाटील, तेजस पाटील. ए.ए.पाटील, सुरेश पाटील, आदीं उपस्थित होते.