कुरंगी येथे रोगनिदान शिबिर

0

पाचोरा। तालुक्यातील कुरंगी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्म शताब्दी दिना निमित्त पंचायत समिति सदस्य बंसीलाल पाटील यांनी कान, नाक, घसा रोग निदान शिबिराचे आयोजन केले.

शिबिरास भाजपा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सभापति सुभाष पाटील, शहराध्यक्ष नंदू सोमवंशी, प्रदीप पाटील, अमोल शिंदे, गोविंद शेलार, किशोर निमभोरिकर, कुरंगी सरपंच गजानन पावर यांची उपस्थिती होती. जळगाव जिल्हा वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.संजीवजी पाटील यांनी कान नाक घसा या आजारा बाबत मार्गदर्शन करुण 125 रुग्णांची मोफत तपासणी केली. परिसरातील नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी शुभम पाटील, तुकाराम मिस्तरी, रत्नराज साळुंखे, समाधान भोई, धनराज भोई, संतोष कोळी यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.