कुरूळी चिंबळी फाट्यावर गुरूवारी वाहतूक कोंडी

0

भाविकांना सहन करावा लागला त्रास

चिंबळीः आषाढी पायी वारी काळात मोशी ते चाकण रस्त्यावर आळंदी फाटा ते कुरूळी-चिंबळी फाटा येथे गुरूवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. चाकण पोलीस ठाण्याच्यावतीने गेल्या तीन दिवसांपासुन वाहतूक नियंत्रण राबविले जात आहे. वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशीवर्गाचे व वारकरी भाविकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागल्याचे चित्र पावायास मिळत आहे. या परिसरात वाहतूक कोंडी रोजच होत असल्याने मोठे

वाहतूक कोंडीमध्ये भर
खेड तालुक्याच्या चिंबळी परिसरात औद्योगिक क्षेत्रामुळे जडणघडण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे जड मालवाहू गाड्यांची वर्दळ वाढली आहे. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चाकण ते भोसरी व चिबंळी फाटा मार्गे आळंदी-मरकळ या रस्त्यावर रात्रंदिवस मालवाहतूक गाड्यांची वर्दळ असते. त्यामुळे कुरूळी-आळंदी फाटा येथे नेहमी वाहतूक कोडीं होत असते. वाहनांच्या चार ते पाच कि.मी रांगा लागत असतात. याठिकाणी वाहतूक नियंत्रण पोलीस यंत्रणा सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत असते. याठिकाणी नित्याचिच वाहतूक कोडीं बनली आहे. पालखी प्रस्थान सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातुन लाखो भाविक आळंदी व देहू येथे जाण्यासाठी पुणे-नाशिक महामार्गावरील या रस्त्याचा वापर करीत असतात. गेल्या दोन दिवसांपासुन होत असलेल्या वाहतूक कोडींमुळे वारकरी भाविकांना वाहतूक कोडींला सामोरे जावे लागते आहे.