मुंबईच्या अधिकार्यांनी दप्तर घेतले ताब्यात
भुसावळ :- स्वस्त धान्यातील ‘मापाच्या पाप प्रकरणी’ मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हाकाकोडासह बोदवड येथील शायसकीय गोदामाला राज्यस्तरीय दक्षता पथकाने रविवारी रात्री उशिरा टाळे ठोकले शिवाय महत्त्वाचे दप्तर ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत जिल्ह्यातील सात गोदाम सील करण्यात आले आहेत. त्यात कुर्हासह बोदवड, भुसावळ व एरंडोल, मुक्ताईनगर, पारोळा, भडगाव येथील गोदामाचा समावेश आहे.